स्ठितीक विद्युत

१. पदार्थ म्हणजे काय? तर आपल्याला दिसतात त्या सर्व वस्तु, जगात असे अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत. कोणते बरं??... म्हणजे काच आहे , प्लास्टीक आहे, लोखंड आहे, पितळ आहे, सोन चांदी , रबर, कागद, लाकुड, कपडे- कपड्यात पण लोकर आहे, सुती आहे, पॉलीस्टर आहे. आणी हे सगळे पदार्थ लहान म्हणजे अतीशय लहान कणांनी बनलेले असतात. म्हणजे आपण गव्हाच कसं पीठ करतो. पीठाचा एक लहान कण घेतला, तर त्याचेही अजुन लहान कण करत गेलो म्हणजे येवढे लहान कण की त्यापेक्षा लहान कण असुच शकत नाही, येवढ्या लहान कणाला अणु असं म्हणतात आणी आता हा अणु कसा बनला असेल बरं , म्हणजे येवढा लहान कणाच्या आत काय असेल???? हा येवढा लहान कण आपण पाहु शकतो का??? तर नाही पाहु शकत... ...पण हा अणु म्हणजे लहान कण एका वेगळ्या दुर्बीणीतुन दिसु शकतो.. प्रतेक पदार्थाचा लहान कण कसा बरं दिसेल??? त्यालाच सायन्स मध्ये म्हणतात अणुची संरचना, म्हणजे अणु कसा आहे ह्याचा दुर्बीणीतुन केलेला आभ्यास.... आता आपल्याकडे ती दुर्बीन नाहीये...पण तो कण कसा असतो, म्हणजेच अणूची संरचना ही अशी असते.. ते आपण या आक्रुतीतुन पाहुया अणु संरचना आकृती: तर येवढुसा लहा...