Posts

Showing posts from December, 2020

भौतीक बदल:

 भौतीक बदल: सोप्या भाषेत हे समजावुन आणि लिहुन घ्या: एखाद्या पदार्थामध्ये , वस्तुमध्ये जे बदल घडल्यामुळे त्याच्या पदार्थाच्या मुळ स्वभावात बदल होत नाही, बदलत ते फ़क्त त्याच दिसणं- म्हणजे बदलतो त्याचा फ़क्त आकार , त्याची अवस्था (स्थायु, द्रव व वायु) पण त्याचा प्रतेक कणामधला त्याचा अंश तसाचं रहातो. त्यापासुन दुसर्याच प्रकारचा पदार्थ निर्माण होत नाही. म्हणजेच त्या पदार्थाच्या अणुची रचना बदलत नाही. भौतीक बदल उदाहरणे: कागदाचे तुकडे केले तरीही कागद हा कागदच राहतो. कागदाचा चोळामोळा केला तरिही त्याला तुम्ही कागदच म्हणाल, प्लास्टीक नाही म्हणणार. काच तुटली तरी त्याला काचेचे तुकडे असं म्हणता येईल,  वरील उदाहारणांमध्ये भौतीक बदल झाला, त्याचं दिसणं बदललं पण त्याच्या बारिक कणांची रचना नाही बदलली पुस्तकातील व्याख्या: बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहे तसेच राहिले. म्हणजेच त्यांचे संघटन कायम राहिले. कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही. अशा बदलास भौतिक बदल (Physical change) असे म्हणतात. रासायनीक बदल: जेन्व्हा रासायनीक क्रिया घडताना तेंव्हा आपल्याला हे दिसते: १. रंग बदलणे २. उष्णता बाहेर पडणे. ३. बुडबु