Posts

Showing posts from March, 2021

कंपोस्टिंग विज्ञान

Image
 कंपोस्टिंग करण्यामागचं सायन्स: मी जेंव्हा कंपोस्टिंग सुरु केलं, तेव्हा काहीच माहीती नव्हती, किड्यांची वासाची किळस येत होती. मनापासुन होत नव्हतं कंपोस्टिंग....आणि ह्याच कारण होतं अज्ञान... मग त्यामागच विज्ञान काय आहे हे विज्ञान आश्रम आणि प्रिया भिडे ह्यांच्या कडुन शिकुन घेतलं. जे शिकले, अनुभवलं ते हे आहे : सगळ्यात पहिला प्रश्न पडला, जो सगळ्यांना पडतो कि कश्या कश्याच कंपोस्टिंग मी माझ्या घरी (म्हणजे अगदी १bhk/2 bhk  मध्ये सुद्धा) वास न येता करु शकते? :उष्ट- खरकटं .. जे कुजत वेज नॉनवेज अश्या सर्व नैसर्गीक पदार्थांचे विघटन होऊन माती होते..  खरं तर हे समर्थांंनी छान मांडलं आहे : https://sites.google.com/site/samarthsahitya/home/dasbodh/d15/s4 ओल्या कचर्‍याची (खरं तर इथुन पुढे आपण ह्याला ओला खाऊ म्हणुया) विघटन क्रिया दोन प्रकारांनी होऊ शकते. हवेच्या संपर्कात (Aerobic Composting)  किंवा  हवाबंद जागेत (anaerobic composting).  हवाबंद जागेत (anaerobic composting).  करण्यासाठी वेगळा सेट अप म्हणजे बायोगॅस प्लांट लागतो.  ह्यात भांडवल आहे, पण हवाबंद जागेत विघटन क्रिया घडत असताना मिथेन गॅसची निर्मीत