आंबुशी / Creeping Wood Sorrel

मराठी नाव: आंबुशी Botanical name: oxalis-corniculata Common name: Creeping Wood Sorrel अधिक महिती साठी: http://www.flowersofindia.net/catalog/slides/Creeping%20Wood%20Sorrel.html जगभर पसरलेले आंबट पानाचे तण, त्यामुळे हे मुळचे कुठले हे सांगणे कठीण. हिमालयापासुन सगळीकडेच पसरलेले वाचले, पण कधी वन्य भाग, म्हणजे सह्याद्री घाटात ह्याचे अस्तित्व आढळले नाही. ते दिसते ते शहरी किंवा मानव निर्मीत कुंड्यांमध्ये, बागा व लागवडीची जागा याठिकाणीच! त्यामुळे बरेचजण या तणापासुन आपली बाग कशी वाचवायची या मागे लागलेले आहेत. तण म्हणजे माणसांनी पेरलेल्या बी किंवा झाडा ऎवजी, त्याठिकाणी त्याला न विचारता आलेलं रोपं. आणि त्याचा प्रसार जर जोमाने वाढणारा असेल, तर बिचारा माणुस काय करणार? किती उपटणार? बर्याच निसर्गाचे संवर्धन आणी अभ्यास करणार्याकडुन मातीचा कस कसा राखावा ह्या बद्दल ऐकलं आहे. जमीन कधीच उघडी ठेवायची नाही. जंगलात असतं तसं तीच्यावर नेहमी पालापाचोळा किंवा हिरवळीच्या आच्छादनाचं आंथरुण असावं, त्यामुळे जमीनीला अती ठंडी किंवा उन्हापासुन एक प्रकारचे इ...