आंबुशी / Creeping Wood Sorrel

 मराठी नाव: आंबुशी

 Botanical name: oxalis-corniculata

Common name: Creeping Wood Sorrel

अधिक महिती साठी:

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Creeping%20Wood%20Sorrel.html


जगभर पसरलेले आंबट पानाचे तण,  त्यामुळे हे मुळचे कुठले  हे सांगणे कठीण. हिमालयापासुन सगळीकडेच पसरलेले वाचले, पण कधी वन्य भाग, म्हणजे सह्याद्री घाटात ह्याचे अस्तित्व आढळले नाही.  ते दिसते ते शहरी किंवा मानव निर्मीत कुंड्यांमध्ये, बागा व लागवडीची जागा याठिकाणीच! त्यामुळे बरेचजण या तणापासुन आपली बाग कशी वाचवायची या मागे लागलेले आहेत. 

 तण म्हणजे माणसांनी पेरलेल्या बी  किंवा झाडा ऎवजी, त्याठिकाणी त्याला न विचारता आलेलं रोपं. आणि त्याचा प्रसार जर जोमाने वाढणारा असेल, तर बिचारा माणुस काय करणार?  किती उपटणार?



 बर्‍याच निसर्गाचे संवर्धन आणी अभ्यास करणार्‍याकडुन मातीचा कस कसा राखावा ह्या बद्दल ऐकलं आहे. जमीन कधीच उघडी ठेवायची नाही. जंगलात असतं तसं तीच्यावर नेहमी पालापाचोळा किंवा हिरवळीच्या आच्छादनाचं आंथरुण असावं, त्यामुळे जमीनीला अती ठंडी किंवा उन्हापासुन एक प्रकारचे इन्सुलेशन मिळते. पाणी जास्त वेळ मातीला धरुन रहातं. आणि मातितील सुक्ष्म जीवांना आच्छादनामुळे आसरा मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कालांतराने ह्या आच्छादनाचा कुजल्यावर खत म्हणुन झाडांना उपयोगच होतो.  म्हणुन ग्राउंड कव्हर साठी माझ्या कुंड्यांमध्ये आंबुशी हा पर्याय मला तरी बेस्ट वाटला .  मग मी तिची चिंताच सोडुन दिली. त्याबद्दल अधिक माहिती मिळत गेली. आंबुशी च्या मुळांशी रायझोबीयमचे जीवाणु असतात. त्यामुळे जमिनीत फुकटात नायर्टोजनचे स्ठिरीकरण करुन मिळते. ज्याकरिता आपल्याला वेगळा युरीया घालायची गरज नसते. 



आंबुशी हि एक रानभाजी आहे. :-) .  माझ्या कुंड्यांन्मध्ये फक्त आच्छादनापुरता याचा वापर न रहाता ते हळु हळु माझ्या स्वयंपाकघरात घुसले. नुसती पान खायला तर फार छान आंबट लागतात ,  पण बर्याच ठिकाणी ह्याचा उल्लेख रानभाज्यामध्ये आढळतो. याची भाजी करता येते, किंवा खाजर्‍या अळुच्या, किंवा नुसत्या ह्या भाजीचे डाळ घालुन फतफते बनवतात. म्हणुन ह्याला तण नाही आंबट भाजी म्हणुन जाहीर करायला हवयं! 


खाण्यायोग्य असण्याचे काही संदर्भ:

https://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/93093e92892d93e91c940/913933916-93093e92892d93e91c94d92f93e90291a940-90690292c941936940

https://www.illinoiswildflowers.info/weeds/plants/cr_wdsorrel.html

https://www.ediblewildfood.com/wood-sorrel.aspx

पण ह्यामध्ये असलेल्या oxalic acid मुळे ज्यांना गाउट , हायपर अ‍ॅसिरिटीचा त्रास आहे त्यांनी मात्र ही भाजी खुप प्रमाणात खाणे टाळावे.

https://pfaf.org/user/plant.aspx?LatinName=Oxalis+corniculata#:~:text=The%20leaves%20contain%20oxalic%20acid,calcium%20leading%20to%20nutritional%20deficiency.


आयुर्वेदामध्ये याचे अनेक उपयोग सांगीतले आहेत,  सगळ्यात महत्वाचा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ह्यात असलेले क जीवनसत्व.  जे सर्व ऋतुंमध्ये आपल्या घरी उपलब्ध असते. 

म्हणुनच मी हे आवडते तण  मन लावुन उपटते, व त्याचा वापर पराठ्यांमध्ये करते. :-)  त्यामुळे ह्याचे अतीप्रमाणात सेवन होत नाही. आणि उपयुक्त गुणधर्मांचा फायदा होतो.



मला नेहमी प्रश्न पडायचा हे आंबट पान एका कुंडीतुन दुसर्‍या कुंडीत, किंवा सोसायटीच्या गार्डन मध्ये इतक्या जलद गतीने कसे काय बरं पसरते. त्याच्या बियांच्या प्रसार कसा होतो? एकदा असच ह्याच्या शेंगांचा क्लोज अप घ्यायला गेले, आणी माझ्या स्पर्शाने एक शेंग फ़ुटुन तडातड बिया सर्व दिशांना लांब उडायला लागल्या.  वाचल्यावर कळलं  ह्याच्या शेंगांची विशिष्ट रचना आहे, पाण्याचा थेंब किंवा हळुवार हात लावला असता, शेंगांमधुन ह्या बिया खुप लांब म्हणजे जवळ जवळ १२ फुटांपर्यंत तोफेतुन फेकल्या सारख्या डागल्या जातात. आणि काही दिवसांमध्येच आंबुशीचे यत्र सर्वत्र आच्छादन पसरते.  :-)

आमच्या गार्डनच्या एका भागात आंबुशी थोडीशी तांबुडकी दिसली.  Creeping Wood Sorrel हे जास्त करुन सावलीत छान येते. पण जास्त उन्हाच्या झळा आणि पाण्याचा अभाव असेल तर अधिक ताणामुळे त्याचा रंग तांबुडका होतो. ह्या रंगाची पाने खाने टाळावीत असे वाटते. 


पण ह्याच्याच कुळातील ह्याचा अजुन एक भाऊबंद आहे.  Purple Shamrock/Oxalis triangularis  ह्याचा रंगच मुळात जांभळा आहे. हे खाद्य असल्याचा उल्लेख आढळला नाही. 


https://www.flowersofindia.net/catalog/slides/Purple%20Shamrock.html#:~:text=It%20is%20a%20low%20growing,both%20by%20seeds%20and%20rhizomes.

https://en.wikipedia.org/wiki/Oxalis_triangularis


Comments

Popular posts from this blog

स्ठितीक विद्युत